(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि अणु ऊर्जा सचिवांसोबत मुख्य सचिवांची बैठक | मराठी १ नंबर बातम्या

हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि अणु ऊर्जा सचिवांसोबत मुख्य सचिवांची बैठक
 

          मुंबईदि. 7: येथील हाफकीन इन्स्टीट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभाग सचिव के.एन. व्यास यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.

          मुख्य सचिव कुंटे  म्हणालेराज्य व देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हाफकीन संस्थेच्या उल्लेखनीय योगदानाचा समृद्ध इतिहास आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की महाराष्ट्रासह देशाचा पश्चिम भाग प्लेगस्वाईन फ्लू इत्यादि संसर्गजन्य आजारांना मोठ्या प्रमाणात बळी पडला आहे. हाफकिन संस्थेमध्ये संसर्गजन्य रोगाचे उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची इच्छा असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळेल. अणुऊर्जा विभाग व केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या सहकार्याने या संशोधन केंद्राच्या निर्मितीला गती द्यावीअसे आवाहनही मुख्य सचिवांनी यावेळी केले.

          बैठकीत डॉ. राजेंद्र बडवे यांनी विशेष अत्याधुनिक संस्था स्थापन करण्याबाबत सादरीकरण केले, ज्यामध्ये मूलभूत संशोधन व अभ्यासपूर्ण संशोधन असे दोन्ही विषय असतील. संस्थेच्या स्थापनेच्या दिशेने अंमलबजावणीसाठी एक कृती समिती गठित करण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव श्री. व्यास ह्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवत सहकार्याचे आश्वासन दिले.

          या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजयहाफकिन संस्थेच्या संचालक श्रीमती सीमा व्यासहाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोडटाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवेमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकरआयसीटी मुंबईचे कुलगुरू पंडित आणि टीआयएफआरचे संचालक श्री. रामकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget