आतापर्यंत कोरोना बाधितांपैकी ३००४ (९५%) कर्मचारी परतले घरी
# २४ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण
# ९ हजार कर्मचार्यांना लसीची दुसरी मात्रा
# फेब्रुवारी ते १० एप्रिलपर्यंत ९ हजार कर्माचार्यांची कोरोना चाचणी
मुंबई, दि.११ : मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाने मुक्काम ठोकला आहे. या कोरोनामुळे मंत्रालय, मुंबई महापालिका कर्मचारी, अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह ठरले. त्याचप्रमाणे बेस्टचे कर्मचारी, बस चालक , वाहक हेसुद्धा पॉझिटिव्ह ठरले. त्यापैकी ३००४ (९५%) कर्मचारी हे बरे होऊन घरी परतले. तर उर्वरित कर्मचारी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तसेच, जानेवारी २०२१ नंतरपासून बेस्टच्या ९ हजार कर्मचारी, बस चालक व वाहक यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३८७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
यासंदर्भातील माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यावेळपासून ते आजपर्यंत अत्यावश्यक सेवा म्हणून बेस्ट बस चालक व वाहक हे आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावताना बेस्टच्या वाहक, चालक, कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ३ हजार ४ कर्मचारी (९५%) हे बरे होऊन आपल्या घरी परतले.
उर्वरित कर्मचारी अद्यापही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बेस्ट उपक्रमात २४ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी ९ हजार कर्मचाऱ्यांना तर लसीची दुसरी मात्राही देण्यात आलेली आहे.
बेस्ट उपक्रमात कोरोना नियमांचे पालन करून बेस्टतर्फे अखंड सेवा देण्यात येत आहे.
जानेवारी २०२१ नंतरपासून ते आजपर्यंत म्हणजे १० एप्रिलपर्यंत ९ हजार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ३८७ कर्मचारी (४.३%)हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) ५% पेक्षा कमी कर्मचारी हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह येणे हे प्रमाण चांगले नियंत्रण मानले जाते, असे बेस्ट प्रशा सनाने म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा