मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पदासाठी आज (दिनांक ०९ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती राजूल सुरेश पटेल ह्या १६ मते मिळवून विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या बिंदू चेतन त्रिवेदी यांना ११ मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी २८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. ०५ सदस्य अनुपस्थित होते. या निवडणुकीत ०१ मत अवैध ठरले.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार वसंत शिवराम नकाशे हे १७ मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रियांका प्रफुल्ल मोरे यांना ०० मते मिळाली. एकूण ३६ सदस्यांपैकी १७ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०५ सदस्य अनुपस्थित होते, तर ०३ सदस्य तटस्थ राहिले व ११ सदस्य मतदान प्रक्रियेच्यावेळी अनुपस्थित राहिले.
या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोर किशोर पेडणेकर यांनी कामकाज पाहिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष पदासाठी आज (दिनांक ०९ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिमा शैलेश खोपडे ह्या १८ मते मिळवून विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साक्षी दीपक दळवी यांना ११ मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी ३० सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. त्यापैकी ०१ मत तटस्थांचा अवैध ठरला. ०३ सदस्य अनुपस्थित होते. तर ०१ मत अवैध ठरले.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तुकाराम (कृष्णा) सुरेश पाटील हे १८ मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रजनी नरेश केणी यांना १२ मते मिळाली. एकूण ३६ सदस्यांपैकी ३० सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०३ सदस्य अनुपस्थित होते, तर ०२ सदस्य तटस्थ राहिले व ०१ सदस्य मतदान प्रक्रियेच्यावेळी अनुपस्थित होते.
या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे उप महापौर ऍड. सुहास वाडकर यांनी कामकाज पाहिले.
===
टिप्पणी पोस्ट करा