बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष पदासाठी (२०२१-२०२२) आज (दिनांक ८ एप्रिल २०२१) पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दत्ता पोंगडे हे १७ मते मिळवून विजयी झाले आहेत.
महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या निवडणुकीमध्ये पोंगडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिटा मकवाना (भाजप) यांना १० मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी २८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यातील एक मत बाद झाले. निवडणुकीत तीन सदस्य तटस्थ राहिले. पाच सदस्य गैरहजर होते.
मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.
यानंतर, स्थापत्य समिती (शहर) उपाध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन पडवळ हे १७ मते मिळवून विजयी झाले. श्री. पडवळ यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नेहल शाह (भाजप) यांना १० मते मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा