मुंबई: गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेली तीन ते चार वर्षांपासून ते आजारी होते. मेंदूतील रक्ताश्राव गोठल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शरिराने त्यांना साथ न दिल्याने सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दत्ता इस्वलकर गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते होते. गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. गिरणी कामगारांना घर मिळावे म्हणून त्यांनी लढा दिला.
टिप्पणी पोस्ट करा