(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिवडी परिसरातील मोठी गळती जल अभियंता खात्याद्वारे ‌यशस्वीपणे करण्यात आली दुरुस्त | मराठी १ नंबर बातम्या

शिवडी परिसरातील मोठी गळती जल अभियंता खात्याद्वारे ‌यशस्वीपणे करण्यात आली दुरुस्त



*भंडारवाडा, गोलंजी आणि फॉसबेरी जलाशयातील पाणीपुरवठ्यावर झाला होता परिणाम*

*कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर विविध आव्हाने असून देखील काम 

सुयोग्य प्रकारे करण्यात आले पूर्ण*

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे मिळाव्यात यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने व अविरतपणे कार्यरत असते. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग व जलकामे विभाग हा महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अव्याहतपणे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी नियमितपणे कार्यरत असतो. शिवडी परिसरातील 'टनेल शाफ्ट' (गाडी अड्डा टनेल) येथे काही दिवसांपूर्वी पाण्याची मोठी गळती उद्भवली होती. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ही गळती दुरुस्त करणे हे एक आव्हानच होते. मात्र, जल अभियंता व जलकामे विभागाच्या चमुने युद्धस्तरावर कार्यवाही करून हे दुरुस्ती काम केवळ अडीच तासांच्या अल्पावधीत व योग्य प्रकारे नुकतेच पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता हे काम कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे. 

हे काम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक अभियंता (जलकामे) (तातडीचा दुरुस्ती विभाग) जीवन पाटील यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडा जलाशय, गोलंजी हिल जलाशय व फॉसबेरी जलाशय; या तीन जलाशयांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वरील 'टनेल शाफ्ट' मध्ये ही गळती उद्भवली असल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया जाण्याची शक्यता होती. ज्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, काल बुधवार २८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ७ ते ९:३० या केवळ अडीच तासांच्या कालावधी दरम्यान योग्यप्रकारे हे काम पूर्ण करण्यात आल्यामुळे भविष्यात वाया जाणारे कोट्यवधी लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेच्या संबंधित चमुला यश आले आहे.

===


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget