मुंबई : उदया आणि रविवारी कडक लॉकडाउन आहे. या काळातही लसीकरण सुरू राहाणार आहे. मात्र लसीकरणाचा तुटवडा असल्याने ज्यांना मॅसेज आले असतील त्यांनाच कोविडची लस दिला जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्यांना कोविडची लस घ्यायाची आहे, त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असून ते त्यांनी करून घ्यावे, असे आवाहन ही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबईत केवळ १ लाख ८० हजार सिरमच्या कोविशिल्डचा साठा असून दुसरा डोस घेणाऱ्यांना तो प्राधान्याने दिला जाणार आहे. तर
कोवॅक्सीनचा ४६ हजार ६३० लसींचा साठा आहे. तो देखील दुसरा डोस घेणाऱ्यांना दिला जाणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. लस घेताना सोबत एक व्यक्ती असावी जेणेकरून त्यांना कोणती अडचण आली तर त्या व्यक्तीचा ते साहय घेऊ शकतील. नागरिकांनी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाउनचे पाळावेत, असे आवाहन देखील पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा