(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष | मराठी १ नंबर बातम्या

कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष*३६.३० टक्के नागरिकांमध्ये आढळली  सकारात्मकता; सर्व विभागात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्त नमुन्यांचे करण्यात आले प्रतिपिंड विषयक सेरो सर्वेक्षण

*बिगर झोपडपट्टी परिसरांमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमधील सेरो सकारात्मकतेच्या टक्केवारीत वाढ; तर झोपडपट्टी परिसरांमधील टक्केवारीत नोंदविण्यात आली घट*

मुंबई : कोविड या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचे असते. याच दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची तिसरी सेरो चाचणी नुकतीच करण्यात आली आहे. नमुना निवड पद्धतीचा वापर करून करण्यात आलेल्या या सेरो सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली असून यापैकी ३६.३० टक्के  नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात संबंधित प्रतिपिंडे (Sero positivity / IgG Antibodies) आढळून आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

..

 *यंदाच्या सेरो सर्वेक्षणाचे ठळक पध्दती  पुढीलप्रमाणे आहेत* :-

..

१. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने म.न.पा. क्षेत्रातील नागरिकांचे पहिले सेरो चाचणी सर्वेक्षण तीन विभागात जुलै २०२० मध्ये करण्यात आले होते. तर दुसरे सेरो सर्वेक्षण हे त्याच तीन विभागात ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर आता मार्च २०२१ मध्ये सर्व २४ विभागांत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष हाती आले आहेत. 

..

२. या सेरो सर्वेक्षण अंतर्गत महापालिका क्षेत्रातील दवाखान्याद्वारे जमा करण्यात आलेल्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. तसेच खाजगी  वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्तनमुने सुद्धा  यांचा समावेश होता. 

..

३. यावेळच्या सेरो चाचणी ज्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशाच व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची चाचणी यंदाच्या सेरो सर्वेक्षणात करण्यात आली आहे.

..

४. या सर्व रक्त नमुन्यांची प्रतिपिंड विषयक चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय परिसरात असणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळेत (Molecular Biology Laboratory of BMC) करण्यात आली आहे. 

......

 *यंदाच्या सेरो सर्वेक्षणाचे ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत* 

..

१. सरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ३५.०२ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली. तर महिलांमध्ये ३७.१२ टक्के इतकी सरो सकारात्मकता आढळून आली.

..

२. यंदाच्या सेरो सर्वेक्षणादरम्यान महापालिका दवाखान्यातून (Slum Area) घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये ४१ .६% इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात झोपडपड्डी विभागांत   ५७ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात ४५ टक्के इतकी सेरो सकारात्मकता झोपडपड्डी विभागांत आढळून आली होती.

..

३. खासगी प्रयोगशाळेतून (Non Slum Area)  घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये यंदा २८.५ इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात बिगर झोपडपड्डी  टक्केवारी १६ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात १८ टक्के इतकी सेरो सकारात्मकता बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आढळून आली होती.

..

४. वरील तपशिलानुसार हे स्पष्ट होते की, झोपडपट्टी परिसरातील सेरो सकारात्मकतेची टक्केवारी कमी होत असून बिगर झोपडपट्टी परिसरामध्ये सेरो सकारात्मकतेने मध्ये वाढ होत आहे. सध्या कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरातून रुग्णांना प्रमाणात सापडत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब लक्षात घेतल्यास सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष हे संबंधित परिस्थितीशी जुळत असल्याचे दिसून येत आहे.

..

५. या सर्वेक्षणाच्या आधारे असे नमूद करण्यात आले आहे की, कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने लसीकरण  मोहीम  अधिक गतिमान करने योग्य राहिल.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात साबणाने  धुवावे या बाबी सातत्याने अंगीकारावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget