(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक | मराठी १ नंबर बातम्या

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक
लवकरच यासंदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव करण्यात येणार

                                      --सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

            मुंबईदि. 10 : गेल्या जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोविंड संकटाशी लढत आहे. या काळात कोविड़चा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक लोक कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे सर्व लक्षात घेऊन लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या संदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव लवकरच करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
महाराष्ट्रातील कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला.

            सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की,राज्य शासन लोककलावंतांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रयत्न करीत असून राज्यातील सर्व क्षेत्रातील लोककलावंतांना यात सामावून घेण्यात येईल. आर्थिक सहकार्य कसे करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शासनाने मंजूर केलेले अर्थसहाय्य थेट या लोककलावंतांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहे.
            सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले कीगेल्या वर्षी राज्यात कोविडचा
  प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती. यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. आता सुद्धा राज्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नियमावली तयार करण्यात येऊन यानंतर चित्रीकरण आणि लोककलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात येईल.

            या ऑनलाईन बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विलास थोरातसांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आणि सहसंचालक यांच्यासह रघुवीर खेडकरबाळासाहेब गोरेअरुण मुसळे,प्रदीप कबरे,उदय साटम,रत्नाकर जगतापअनिल मोरेशाहीर दादा पासलकरविशाल शिंगाडेसंभाजी जाधवशाहीर फरांदे,विष्णू कारमपुरीसुभाष साबळेराजेश सरकटे आदी उपस्थित होते.
            फड मालकांना अनुदानलॉकडाऊन संपल्यानंतर कार्यक्रम सुरू करण्याची परवानगीलोककलावंतांना रोख मदतचित्रपटांना सरसकट अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाहीलोककलावंतांची नोंदणीशासनामार्फत देण्यात येणारे अनुदान वेळेवर प्राप्त होणे,कलाकारांसाठी ओळखपत्र असे विविध मुद्दे यावेळी उपस्थित लोककलावंत प्रतिनिधींनी मांडले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget