मुंबई, दि. 13: महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोविड-19 यामहामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशांनुसार कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. 18 ते 20 मे 2021 या काळात दुपारी 3 ते 4 या वेळेत करण्यात आले आहे.
दि. 18 मे 2021 रोजी “जीएसटी आणि त्याचे महत्त्व” या विषयावर विद्याधर गायकवाड (सहायक आयुक्त जीएसटी, मुंबई), यांच्यामार्फत व्याख्यान देण्यात येणार आहे. तसेच दि. 19 मे 2021 रोजी “Business Incubator म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, कार्ये, वBasic Mechanics of Starting Incubator Center या विषयावर चक्रधर दोडके (संचालक, मास्टर स्ट्रोक प्लस, नागपूर, Mentor, BEDC, सदस्यBombay Productivity Council व माजी सहा.संचालक भारत सरकार (Ministry of MSME) हे व्याख्यान देतील. 20 मे 2021 रोजी “उद्योजकता विकास व शासकीय योजना” या विषयावर गणेश खामगळ (संचालक, मिटकोंन, पुणे) हे व्याख्यान देणार आहेत.
हा कार्यक्रम झूम मिटिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आय.डी. : ८७२४१६३३७७१ व पासवर्ड : १२३४ चा वापर करावा. तसेच या कार्यक्रमात बार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह (LIVE) वरून सुद्धा सहभागी होता येईल, त्याची लिंकhttps://www.facebook.com/
००००
टिप्पणी पोस्ट करा