(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे ७६% काम पूर्ण - महापौर किशोरी पेडणेकर | मराठी १ नंबर बातम्या

पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे ७६% काम पूर्ण - महापौर किशोरी पेडणेकर *नालेसफाई कामांची महापौर किशोर पेडणेकर,  उप महापौर अँँड.सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली पाहणी

मुंबई : पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे जवळपास ७६ % काम पूर्ण होत आले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी अधिक गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

    पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक ११ मे २०२१ रोजी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासमवेत पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.


याप्रसंगी आमदार विलास पोतनीस ,  सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प ).पी. वेलरासू, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर , नगरसेविका  रोहिणी कांबळे, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, उपायुक्त (परिमंडळ- ३) पराग मसुरकर, उपायुक्त (परिमंडळ -७ ). विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा ) अनंत कदम, एच/ पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे,  एच/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते,  के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, पी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आर/ मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर /उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (प.ज.वा.) व्यंकटेश कमलापुरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकार उपस्थित होते.


    महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम एच/पूर्व विभागातील वाकोला नदी, एच /पश्चिम विभागातील एसएनडीटी नाला, के/पश्चिम विभागातील ओशिवरा लींक रोडवरील ओशिवरा नदी,पी /दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम लिंक रोडवरील शास्त्री नगर नाला, आर /दक्षिण विभागातील लिंक रोडवरील पोईसर नदी, आर /मध्य विभागातील बोरिवली पश्चिमच्या राजेंद्र नगर नाला, आर/ उत्तर विभागातील दहिसर (पश्चिम ) मधील दहिसर नदीची पाहणी केली.

    त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. *महापौर म्हणाल्या की,* २२ फेब्रुवारी २०२१ पासून नालेसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा नालेसफाईच्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे खंड न पडता नालेसफाईचे काम जोरात सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दोन ते तीन दिवस पाण्याचा निचरा होत नव्हता, सद्यस्थितीत उदंचन केंद्राच्या कामामुळे पाण्याचा निचरा हा दोन ते तीन तासात होत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच दहिसर येथील दहिसर नदीवर पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेली बँड वॉल काढून टाकण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. ज्यामुळे दहिसर गावठाणचा परिसर जलमय होणार नाही, यादृष्टीने काम पूर्ण करण्याचे निर्देशही महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिले.

 *स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव  प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले की,* कोरोनाचे संकट जरी असले तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहे.नालेसफाईच्या संपूर्ण कामावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,पर्यावरण मंत्री. आदित्य ठाकरे यांचे लक्ष असून त्यादृष्टीने ते वेळोवेळी नालेसफाई कामांचा  आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील मोठे व छोटे नाले यांची सफाई मोहीम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदमाता येथील पाणी साचण्याची समस्या लक्षात घेता, याठिकाणी स्टोरेज टँक बनविण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव उद्याच्या स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल,  याचा प्रयत्न या सर्व कामातून असल्याचे त्यांनी सांगितले.


 ********

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget