'तौत्के' या चक्रीवादळामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल सर यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविध स्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला.
..
*याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे मॅडम ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी विशेषत्वाने उपस्थित होते. तसेच महापालिका आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे आणि उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे हे देखील उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा