(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 'तौत्के’ च्या प्रभावाने मुंबईत ८१२ झाडे पडली, पैकी ७०% झाडे विदेशी | मराठी १ नंबर बातम्या

'तौत्के’ च्या प्रभावाने मुंबईत ८१२ झाडे पडली, पैकी ७०% झाडे विदेशी




*५०४ झाडे खासगी परिसरातील, तर ३०८ झाडे सार्वजनिक परिसरातील*


*महापालिकेच्या उद्यान विभागाने अल्पावधीत हटविली पडलेली झाडे*

मुंबई : मुंबई किनारपट्टी लगतच्या परिसरातून दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी 'तौत्के’ या चक्रीवादळाने मार्गक्रमण केले. या चक्रीवादळाचा   मोठा प्रभाव बृहन्मुंबई महानगरपालिका क्ष्रेत्रात दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात वा-याच्या वेगाने तब्बल ११४ किलोमीटर प्रती तास पेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वा-यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात ८१२ झाडे पडली. यापैकी, ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रातील असून ३०८ झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. तथापि, महापालिकेच्या उद्यान विभागाने अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी परिसरातील ५०४ व सार्वजनिक परिसरातील ३०८; यानुसार एकूण ८१२ झाडे पडली. यापैकी सुमारे ७० टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर (Peltoforum), गुलमोहर, गुळभेंडी (Thespesia), रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. *ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.*

..

दिनांक १६ ते १८ मे २०२१ या साधारणपणे ३ दिवसांच्या कालावधी दरम्यान पडलेल्या ८१२ झाडांमध्ये २४९ झाडे ही शहर परिसरातील आहेत. तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी पडली. तर २६७ झाडे ही दिनांक १८ मे २०२१ रोजी पडली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे १ हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना देखील सदर कालावधी दरम्यान घडल्या. यापैकी, ७९८ फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

..

गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिनांक ३ जून ते ६ जून २०२० या कालावधी दरम्यान ३२३ झाडे पडली होती. ज्यापैकी २२१ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १०२ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. तर त्यानंतर दिनांक ५ व ६ ऑगस्ट २०२० या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान देखील महापालिका क्षेत्रात वेगवान वा-यांमुळे ३५५ झाडे पडली होती. ज्यापैकी १७९ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १७६ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. या पडलेल्या झाडांमध्ये देखील विदेशी झाडांचे प्रमाणे अधिक होते. *या अनुषंगाने नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची (Tree Audit) कार्यवाही देखील नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.*

..

दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी तौत्के चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बृहन्मुंबई  महानगरपालिका क्षेत्रात पडलेल्या झाडांची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणेः-



===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget