मुंबई : भारूडरत्न निरंजन भाकरेंचा भारुडाचा वारसा कायम चालु ठेवण्यासाठी त्यांचा मुलगा शेखर भाकरे सज्ज झाला असून भारूड हे थांबले नसून येथून पुढेही ते चालूच राहिल असा वसा शेखर ने घेतला आहे.
२३ एप्रिल २०२१ रोजी अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या भारुड कलेतून प्रबोधनाचे वेड लावणारे भारूड रत्न निरंजन भाकरे यांनी अखेरचा निरोप घेतला.. अख्ख्या महाराष्ट्राने दुःख व्यक्त केले... जवळपास सर्वांनाच आता प्रश्न पडला होता कि भाकरे यांचा भारूड या लोककलेचा वारसा आता पुढे जाणार कि इथेच थांबणार पण आज त्यांच्या मुलाने एक पोस्ट शेअर करताना असे म्हटले आहे कि माझे वडील भारूडरत्न निरंजन भाकरे यांचा हा भारूड लोककलेचा वारसा मी त्यांचा मुलगा या नात्याने अखंड चालूच ठेवणार, भारूड या आधीही थांबले नाही आणि या नंतर सुद्धा थांबणार नाही असे त्यांचे चिरंजीव शेखर भाकरे यांनी ती पोस्ट शेअर करताना म्हटले... त्यांच्या या पोस्ट ला निरंजन भाकरे यांच्या चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला...
शेखर भाकरे हे त्यांच्या वडील निरंजन भाकरे यांना त्यांच्या कर्यक्रमामध्ये हर्मोनिअम् आणि सिन्थेसायजर ची साथ करीत होते, अचानक हे दुःख भाकरे कुटुंबीयांवर पडले पण त्यामधून लगेच सावरून मुलाने हा वारसा चालू ठेवण्याचा संकल्प केला त्यावेळी अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आणि शुभेच्छारुपी आशीर्वाद दिलेत... तर हा वारसा जपण्यासाठी त्यांना निरंजन भाकरे यांचेच कलाकार शेखर भाकरे यांना सहकार्य करणार आहेत.
भारूडरत्न निरंजन भाकरे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागातील विद्यार्थ्यांना भारुड शिकवत असे.
टिप्पणी पोस्ट करा