(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लसीकरण केंद्रावर लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे | मराठी १ नंबर बातम्या

लसीकरण केंद्रावर लशींची उपलब्धता पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे



 *लोअर परेल मधील तसेच पवईच्या पवई उद्यान शाळेत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे  महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर किती लशींची उपलब्धता आहे ? याची महानगरपालिकेच्या ट्विटरवर माहिती घेऊनच नागरिकांनी लसीकरणासाठी घराबाहेर पडावे, असे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.




स्थानिक शिवसेना नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चुनाभट्टी येथील  माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राचे उद्घघाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ०७ मे २०२१ रोजी पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

       याप्रसंगी आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, माजी नगरसेवक विजय तांडेल, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज व संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

         पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की,  सुरुवातीला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली असून  आता अधिक उत्सुकता निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. लसीकरण केंद्रावर आल्यानंतरसुद्धा नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क हा ठेवलाच पाहिजे. त्यासोबतच प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाली पाहिजे तसेच लसीकरण केंद्रासाठी नगरसेवकांमध्ये हेल्दी स्पर्धा असली तरी चालेल,जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र तयार होतील, असे प्रतिपादन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

त्यापूर्वी, लोअर परेलच्या सेनापती बापट मार्गावरील द वर्ल्ड टाँवरमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनतळाच्या जागेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी तसेच ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून या लसीकरण केंद्राचे तसेच पवईच्या पवई उद्यान शाळेत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दि. ०७ मे २०२१ रोजी पार पडले,

 याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, माजी आमदार सचिन अहिर, जी / दक्षिण विभागाचे  प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, स्थानिक नगरसेवक अँड. संतोष खरात, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, उपायुक्त (परिमंडळ - २ ) विजय बालमवार, जी / दक्षिण विभागाचे  सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

 प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौरांनी संपूर्ण लसीकरण केंद्राची पाहणी केली. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, नागरिकांच्या दुसऱ्या डोजला प्राधान्य देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवर किती नागरिकांची आज लसीकरण होऊ शकेल ? किती लस आज उपलब्ध झाली आहे ? याची माहिती दर्शविणारा फलक लावण्यात यावा, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. सद्यस्थितीत कोविन ॲपवर स्लाँटस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून याबाबत राज्य सरकार किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेला अँप विकसित करता येणे शक्य आहे का ? तसा प्रयत्न सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.

********

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget