(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील 113 नगरपंचायतींसाठी 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील 113 नगरपंचायतींसाठी 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

 


 

            मुंबईदि. 18 (रानिआ): राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातीलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

            श्री. मदान यांनी सांगितले कीएप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 88डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 7 नवनिर्मित अशा एकूण 113 नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

            प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- मुरबाड व शहापूरपालघर- तलासरीविक्रमगडमोखाडारायगड- खालापूरतळामाणगावम्हसळापोलादपूरपाली (नवनिर्मित)रत्नागिरी- मंडणगडदापोलीसिंधुदुर्ग- कसई-दोडामार्गवाभवे-वैभववाडीकुडाळदेवगड- जामसंडेपुणे- देहू (नवनिर्मित)माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित)सातारा- लोणंदकोरेगावपाटणवडूजखंडाळादहीवडीसांगली- कडेगावखानापूरकवठे-महाकाळसोलापूर- माढामाळशिरसमहाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित)वैराग (नवनिर्मित)नातेपुते (नवनिर्मित)नाशिक- निफाडपेठदेवळाकळवणसुरगाणादिंडोरीधुळे- साक्रीनंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळअहमदनगर- अकोलेकर्जतपारनेरशिर्डीजळगाव- बोदवडऔरंगाबाद- सोयगावजालना- बदनापूरजाफ्राबादमंठाघनसावंगीतीर्थपुरी (नवनिर्मित)परभणी- पालमबीड- केजशिरूर- कासारवडवणीपाटोदाआष्टीलातूर- जळकोटचाकूरदेवणीशिरूर-अनंतपाळउस्मानाबाद- वाशीलोहारा बु.नांदेड- हिमायतनगरनायगावअर्धापूरमाहूरहिंगोली- सेनगावऔंढा-नागनाथअमरावती- भातकुलीतिवसाधारणीनांदगाव-खंडेश्वरबुलडाणा- संग्रामपूरमोताळायवतमाळ- महागावकळंबबाभुळगावराळेगावमारेगावझरी जामणीवाशीम- मानोरामालेगावनागपूर- हिंगणाकुहीभिवापूरवर्धा- कारंजाआष्टीसेलूसमुद्रपूरभंडारा- मोहाडीलाखनीलाखांदूरगोंदिया- सडकअर्जुनीअर्जुनीगोरेगावदेवरीचंद्रपूर- सावलीपोंभुर्णागोंडपिपरीकोरपनाजिवतीसिंदेवाही-लोनवाहीगडचिरोली- मुलचेराएटापल्लीकोरचीअहेरीचामोर्शीसिरोंचाधानोराकुरखेडा आणि भामरागड. एकूण- 113.

0000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget