(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत - राज्यमंत्री संजय बनसोडे | मराठी १ नंबर बातम्या

पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत - राज्यमंत्री संजय बनसोडे

 


            मुंबईदि. 23 : ‘जल ही जीवन’ हे ब्रीद लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणजिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून कामे पूर्ण करावीतअसे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

           राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिरूर-हवेलीरिसोड-मालेगावनांदेड दक्षिण आदी मतदारसंघांमधील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. यावेळी विधानसभा सदस्य सर्वश्री अशोक पवारअमित झनकमोहनराव हंबर्डे यांच्यासह विधानसभा सदस्य  शेखर निकमसंदीप क्षीरसागरआशुतोष काळेपाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वालमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजल जीवन अभियानचे संचालक हृषिकेश यशोद तसेच अधिकारी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणालेग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रति व्यक्ती 55‍ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणजल जीवन अभियान आदी यंत्रणांनी आपल्याकडे प्रलंबित असलेल्या कामांना तातडीने मंजूरी घेऊन कालबद्ध पद्धतीने ती पूर्ण करावी. ज्या कामांना मंजूरी प्राप्त झालेली आहे ती कामे डिसेंबर अखेर पर्यंत तर इतर कामे जानेवारी अखेरपर्यंत सुरू करावीत. जेथे जलस्त्रोत उपलब्ध नाहीत अशा गावांसाठी जलस्त्रोतांची निर्मिती करणे व जेथे जलस्त्रोत उपलब्ध आहेत त्यांचे बळकटीकरण करणेपूरक स्त्रोत निर्मिती करणेलोकसंख्या वाढीनुसार जुन्या योजनांची आवश्यकतेनुसार पुनर्जोडणी करणे या कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. कोणतीही शाळा आणि अंगणवाडी पाणी पुरवठ्याविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी दिले.

            प्रधान सचिव श्री.जैस्वाल यांनी पाणी पुरवठ्याच्या संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ अपुरे आहे तेथे कंत्राटी पद्धतीने पद भरण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेतत्यांच्या मदतीने योजनेची प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करून दिलेल्या मुदतीत कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget