(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई | मराठी १ नंबर बातम्या

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई


            मुंबईदि. 23 : "मायफेअर क्रिम" चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि.पोआंटा साहिबहिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर 'त्वचेचा रंग उजाळतेअशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून 14 लाखांचा व नागपूर येथून 34 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 106, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

            औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीचे उल्लंघन  करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक 1800222365 वर संपर्क करावाअसे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget