(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | मराठी १ नंबर बातम्या

मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 


           

            मुंबईदि. 23 : राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवानाडिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने  सोडविणार असल्याचे पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            मंत्रालयातील दालनात राज्यातील मच्छिमार बांधवांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. या बैठकीला उपसचिव श्रीनिवास शास्त्रीमत्स्यव्यवसाय सहआयुक्त रा.ग.जाधवमत्स्यव्यवसाय सहआयुक्त (सागरी) सं. गो. दप्तरदारमच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळीमुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपकेमंगेश कोळीबिपीनचंद्र पाटीलआखिल भारतीय कोळी संघटनेच्या श्रीमती मालिनी वरळीकरमच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यावेळी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, सागरी महामार्ग जिथे होत आहे त्या ठिकाणी असणाऱ्या कोळी  बांधवांच्या अनेक मागण्या आहेत. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठकीचे आयोजन करून त्यासंदर्भात मत्स्यव्यवसायिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. तसेच डिझेल विक्री परताव्याची रक्कम विहित वेळेत वितरण करणेमत्स्यव्यवसायिकांना मासे विकण्यासाठी  परवाने देण्यासंदर्भातही कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीत दिली.

         यावेळी मच्छीमार संघटनेचे डॉ.रूपेश कोळीमुंबईच्या मच्छिमार सेलचे प्रदीप टपकेमंगेश कोळीबिपीनचंद्र पाटील, आखिल भारतीय कोळी संघटनेच्या मालिनी वरळीकर, मच्छिमार सेल पेण तालुका अध्यक्ष मोनिका गोटेकर यांनी राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न बैठकीत मांडले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget