(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश 

            मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु  इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

            गुटखापानमसालासुगंधित तंबाखू आणि सुपारीखर्रामावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज  मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेगृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवप्रधान सचिव संजय सक्सेनाअन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंगअतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंगसहसचिव दौलत देसाईयांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखापानमसालासुगंधित तंबाखू,सुपारी  व इतर पदार्थांच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादनविक्रीसाठवणूकवितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे जाळे मजबूत करावेतसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारींवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल असे सांगितले.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget