(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार - उपमुख्यमंत्री अजित पवार | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

 


·       विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार

·       सार्वजनिक सुविधांच्या वापरात शिस्त आवश्यक

 

            अहमदनगरदि. 13 (जिमाका ) कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले.

            कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजनउद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी,आयोजित सभेत उपमुख्यमंत्री श्री .पवार बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेआमदार रोहित पवारआमदार राजेंद्र पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचे संकटनिसर्ग,तौक्ते चक्रीवादळतसेच अतिवृष्टीमुळे आव्हाने उभी राहिली. परंतु ,आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे. विकासकामे करताना भेदभाव करण्यात येणार नाही. याबरोबरच वीज व पाणी यांचा वापर जपून करणे गरजेचे आहे.सार्वजनिक सुविधांच्या वापरातही शिस्त आवश्यक आहे .भविष्यात या भागात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार असून तरुणांनी समाजकारण करण्यासाठी पुढे यावे.

            शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासकामे मुदतीत पूर्ण करतानाच त्याचा दर्जा उच्च प्रतीचा ठेवण्याचे निर्देश यावेळी श्री.पवार यांनी दिले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कर्जत तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जत तालुक्यातील विकास कामांचे कौतुक केले आणि ती अनुकरणीय असल्याचे सांगितले.

            आज झालेल्या उद्घाटनात कर्जत पंचायत समिती विस्तारीत बांधकामबस डेपो व व्यापारी संकुल बांधकामतालुका प्रशासन प्रशासकीय इमारत बांधकामतलाठी कार्यालयमहसूल कर्मचारी निवासस्थानेशासकीय विश्रामगृह बांधकाम तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहत निर्माण कामांचा समावेश आहे.

000000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget