(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

 


मुंबईदि. 21 : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या असीम त्यागसमर्पणातून आधुनिक महाराष्ट्र उभा राहिला आहेभाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा वीरांबद्दत कृतज्ञता व्यक्त केली.

या हुतात्म्यांनी दिलेला लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहोचविणेतिची धार कायम ठेवणे हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची वज्रमूठ करूया, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

000

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबईदि. 21: संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.

पमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीनेप्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशालीप्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल'. दरम्यान मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदींनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget