(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | मराठी १ नंबर बातम्या

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 


 

            मुंबई, दि. 23 : पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या (आर्बिट्रेटरच्या) निवाड्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  यांनी दिले.

             आज मंत्रालयात पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तवभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण, पुणे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस दूरदृश्यप्रणालीद्वारे तसेच उपसचिव श्री.कुलकर्णीॲड.शीतल चव्हाण उपस्थित होते.

             राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे. या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तत्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव यांनी भूसंपादित शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीवर तसेच प्राधिकरण करत असलेल्या कार्यवाहीची माहिती या बैठकीत दिली.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget