(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ७३२ कोटी रूपये वितरीत - इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार | मराठी १ नंबर बातम्या

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ७३२ कोटी रूपये वितरीत - इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 


  २०२१-२२ या वर्षाचा शंभर टक्के निधी वितरीत

           

            मुंबईदि.२४ : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आज ७३२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत.तर ऑक्टोंबर २०२१ पर्यंत ७३२ कोटी रूपये यापूर्वीच वितरीत करण्यात आले होते.त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षासाठी शंभर टक्के निधी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

                इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन २०२१-२२ या वर्षासाठी १४६४ कोटी रूपये इतका निधी अर्थसंकल्पित केला होता.त्यापैकी ऑक्टोबर  २०२१ पर्यंत ५० टक्के निधी ७३२ कोटी रूपये वितरीत करण्यात आला होता. इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उर्वरीत निधी वितरीत करण्याबाबत विनंती केली होती. दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एकूण अर्थसकंल्पीत १४६४ कोटीमधील उर्वरीत ५० टक्के रक्कम ७३२ कोटी रूपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यानुसार अर्थसंकल्प‍ित मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठीची  २०२१-२२ या वर्षासाठीची रक्कम शंभर टक्के वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

                                                                *****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget