(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृज्ञतापूर्वक अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृज्ञतापूर्वक अभिवादन

 


 

         मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे जगद्विख्यात नेतृत्वहिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मितामहाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या आभाळाएवढ्या उंचीच्या महान नेतृत्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे. अद्वितीय वक्तासाक्षेपी संपादकसिद्धहस्त  व्यंगचित्रकारमोठ्या मनाचा दिलदार माणूसअशा शब्दात त्यांनी बाळासाहेबांना कृतज्ञापूर्वक वंदन केले.


 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या

 स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

 

          मुंबई, दि. 17 : हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार  अर्पण करून अभिवादन केले.

          उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 9 वा स्मृतीदिन विधान भवन येथे पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापकराजकारणीव्यंगचित्रकारसंपादक असे त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान होते. शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी अस्मितामहाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

          शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री दिवाकर रावते, नाना पटोलेअशोक पवारअभिजीत वंजारीअमोल मिटकरीसरोज अहिरे,  विक्रम काळेकपिल पाटील, अमित झनक, सुधीर तांबे, महादेव जानकर, राजेश राठोड, प्रकाश फातरपेकर, श्रीमती यामिनी जाधवश्रीमती मनिषा कायंदेनिर्मला गावित, श्रीमती सुमनताई पाटील, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवतउपसचिव राजेश तारवीअवर सचिव रवींद्र जगदाळेसुनिल झोरेपुनम ढगेसायली कांबळे यांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget