(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); युवकांनी मतदार नोंदणीकरिता मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

युवकांनी मतदार नोंदणीकरिता मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



 

            मुंबईदि. 25 : दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व युवकांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता नोंदणी करावीअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

            मतदार नोंदणीसाठी http://electionmumbaicity.org.in/ या वेबसाईट किंवा 1800 22 1950 टोल फ्री कमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता. याशिवाय व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर जाऊन नाव ऑनलाईन नोंदणी करू शकता. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालू असणाऱ्या विशेष मोहिमेत सहभागी होऊन स्वत:चे नाव मतदार यादीत समाविष्ट करावेअसेही आवाहन श्री.निवतकर यांनी नागरिकांना केले आहे.

000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget