(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

 


 

            मुंबईदि. 16 : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 15 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

            60 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदीसंगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

            नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिकानियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

1)   मुंबईकोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्गमुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

2)   पुणे महसूल विभागातील संस्थांनीसहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयबंगला क्रमांक-4, विमानतळ रोडपुणे (020-26686099) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

3)   औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयरुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंगगोल्डी टॉकीजच्या समोरस्टेशन रोडऔंरगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

4)   नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयद्वारा : अभिरक्षकमध्यवर्ती संग्रहालयअस्थायी प्रदर्शन हॉलतळमजलासिव्हिल लाईननागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

            विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाहीयाची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाहीतर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईलअसे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी कळविले  आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget