मुंबई : दिवाळी सणानिमित्त इंदिरा डॉक अग्निशमन केंद्र येथे *दिवाळी फराळ* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगावकर आणि विभागीय अग्निशमन अधिकारी प्रीतम सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात इंदिरा डॉक अग्निशमन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, तसेच रहिवाशी सहभागी झाले होते.
दिवाळीनिमित्त इंदिरा डॉक अग्निशमन केंद्र येथे आकाश कंदील व दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. तर अग्निशामक किशोर मोहिते यांनी सुमधूर आवाजात जुन्या जमान्यातील गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यकारी अधिकारी उत्तम भगत यांनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मागचा उद्देश नमूद करताना सांगितले की, "दैनंदिन कामात आपण सगळे नेहमीच व्यस्त असतो.काही सणांच्या निमित्ताने एकत्र यायला मिळते व एकोपा वाढतो."
विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगांवकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत म्हणाले की, " नित्य कामातून थोडासा बदल म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले पाहिजे" तर विभागीय अग्निशमन अधिकारी प्रीतम सावंत साहेब म्हणाले की, "कार्यक्रम छोटासा असला तरी उद्देश चांगला आहे. फक्त फटाके फोडणे म्हणजे दिवाळी नव्हे. असे एकत्रित येऊन दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद वेगळाच आहे." सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल कार्यकारी अधिकारी उत्तम भगत यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा