(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा | मराठी १ नंबर बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा

 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने संविधान शिल्पकारांना मानवंदना

संविधानात एकात्मतेचा अखंड जागर

 

            मुंबई, दि. 26 :- "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 'आझादी का अमृत महोत्सव' आपण साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा "संविधान दिन" आणखी औचित्यपूर्णविशेष महत्त्वाचा आहेअसे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना 'नागरिककेंद्रबिंदू मानूनत्यांच्या अधिकार-हक्कालाहिताला संविधानात सर्वोच्च स्थान देण्यासाठी आपले ज्ञानविद्वत्ता पणाला लावण्याचे अपूर्व योगदान देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकारांना या निमित्ताने मानवंदना देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

            भारतीय घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र सुपुत्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीच्या सदस्यांना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे संदेशात म्हणतातभारतीय संविधान जगात मार्गदर्शक असे मानले जाते. संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाचत्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे. न्यायस्वातंत्र्यसमताबंधुता यातून राष्ट्रीय एकात्मता या मुल्यांचा अखंड जागर करणारे हे संविधान भारतीय नागरिकांनी आजच्या दिवशी स्वतः ला समर्पित केले आहे. त्याच आधारावर आपली आतापर्यंतची  सामाजिकआर्थिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली आहेती आणखी लोकाभिमुख व्हावी. विकासाचे प्रत्येक पाऊलयोजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी यासाठी आपण कटीबद्ध होऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानात्याची अमृत फळं सर्वच जनमानसाला चाखायला मिळावित यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया. त्यांचा अंगिकार करूयाअसेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget