(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे १५ हजार कोटींचे सामंजस्य करार | मराठी १ नंबर बातम्या

वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे १५ हजार कोटींचे सामंजस्य करार

 


 

          मुंबई : वर्ल्ड एक्स्पोदुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत २५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून रु. १५,२६० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहेया माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

          दि. २० नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य करारात जापानसिंगापूरस्वीडन कोरिया जर्मनी इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटकलॉजिस्टिक्सप्राणवायू उत्पादनईव्हीटेक्सटाईलडेटा सेंटरऔषध निर्माणजैवइंधन व तेल आणि वायू ई. विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

          याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्योग) श्री. बलदेव सिंगआयुक्त (उद्योग)श्री. हर्षदीप कांबळेएमआईडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. पी. अनबलगनसह.मुख्य कार्यकारी अधिकारीश्री. ए. एस. आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) श्री. अभिजित घोरपडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

दि. ०१ ऑक्टोबर२०२१ ते ३१ मार्च२०२२ या कालावधी मध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील उद्योजक/गुंतवणूकदारशासकीय विभाग सहभागी झाले आहेत.

या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन दि. १९  नोव्हेंबर २०२१ रोजी मा. मंत्री (उद्योग)श्री. सुभाष देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget