(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना | मराठी १ नंबर बातम्या

अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना

 



             मुंबई, दि. 26 : केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. शहरातील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर यांनी केले आहे.


         सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७१ कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी   केले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget