आता राजकोट महानगरपालिकाही ठोंबरे यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करत रस्ते बांधणार
मुंबई : मुंबई महापालिकेचे रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांच्या खड्डे मुक्त अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग या तंत्रज्ञानाचा वापर देशभरातील बहुतेक महानगरपालिकेने स्विकार केला असून आता राजकोट महापालिकेनेही त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतः चे रस्ते तयार करण्याचे पाऊल उचलणार आहे. कार्यकारी अभियंता ठोंबरे यांच्या कामगिरीमुळे मुंबई महापालिकेची मान अभिमानाने उंचावली आहे. मुंबई महापालिकेसाठी ही खास गौरवास्पद बाब असल्याने मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी कार्यकारी अभियंता ठोंबरे यांचा सत्कार केला.
कार्यकारी अभियंता ठोंबरे यांनी अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग या विषयावर पीएचडी केली आहे. अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे नवे तंत्रज्ञान रस्ते बांधण्यासाठी पर्यावरणपूरक आहे. ठोंबरे यांच्या अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बांधल्यानंतर एकही खड्डा पडत नाही. यामुळे राजकोट महानगरपालिकेचे आयुक्त आणि अभियंता यांनी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांना नुकतेच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत आमंत्रित केले होते. ठोंबरे यांनी कार्यशाळेत सादरीकरण केलेल्या अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाने उपस्थित अभियंता आणि राजकोट महानगरपालिकेचे आयुक्त यांचे मन जिंकले. आता सुरुवातीला ठोंबरे यांच्या अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाने राजकोट महानगरपालिकेचे तीन रस्ते तयार केले जाणार असून पुढे संपूर्ण राजकोटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय येथील आयुक्तांनी घेतला आहे.
देशभरात रस्ते बांधणीचे नियम ठरविणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान बनविले गेले आहे. ठोंबरे यांच्या अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आतापर्यंत ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, गाझियाबाद, हैदराबाद महानगरपालिका सोबत विविध सरकारी यंत्रणाने केला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ही ठोंबरे यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करत शंभराहून अधिक रस्ते तयार केलेले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा