(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह ; बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह ; बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

  


            मुंबईदि.१२ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृहबोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे सुरू आहे.तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

            वसतिगृहामधील प्रवेशासाठी नियमावली पुढीलप्रमाणे.अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिला अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्गअनाथ या वर्गवारीतील असावी.अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेलतेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आईवडीलपती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हददीत रहात नसावेत.अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतीगृह सोडावे लागेल.काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील.त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील.वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी रक्कम अनामत रक्कम म्हणून वसतिगृहात व्यवस्थापकांकडे जमा करावी  लागेल.

               इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज करताना पुढील कागदपत्र आवश्यक आहेत.अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखलादोन पासपोर्ट फोटो,ओळखपत्र (पासपोर्ट/ आधारकार्ड/संबंधित प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र) अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई-७१ येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

००००         

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget