(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिवाळी अंक प्रदर्शन दिल्लीकर वाचकांसाठी पर्वणी : उपविभागीय अधिकारी डॉ. पियुष रोहणकर | मराठी १ नंबर बातम्या

दिवाळी अंक प्रदर्शन दिल्लीकर वाचकांसाठी पर्वणी : उपविभागीय अधिकारी डॉ. पियुष रोहणकर

 


नवी दिल्ली30 : दिवाळी अंक प्रदर्शन दिल्लीकर वाचकांसाठी पर्वणी असल्याचे गौरवोगार उपविभागीय अधिकारी डॉ.पियुष रोहणकर यांनी काढले.

 महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली जिल्ह्याच्या छावणी उप विभागीयचे उपविभागीय अधिकारी डॉ. पियुष रोहणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री रोहणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकरउपसंपादक रीतेश भुयारग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.रोहणकर पुढे म्हणालेआजचा काळ हा समाज माध्यमांचा असूनही वाचन संस्कृतीला वाढविण्याचे काम दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत आहे हे प्रशंसनियच आहे. परिचय केंद्राच्यावतीने दिवाळी अंक प्रदर्शन मांडणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पंरपरेला साजेसा उपक्रम असल्याचेही डॉ. रोहणकर यावेळी म्हणाले.

डॉ. पियुष रोहणकर हे वर्ष 2014 च्या भारतीय प्रशासकिय सेवा (दानिक्स) कॅडरचे अधिकारी आहेत. यासोबत ते लेखकही आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांवर आधारीत  ए प्लेसेंट इस्केप  ही इंग्रजीतील कांदबरी लिहीली आहे. यासह ते कविता करतात.  

 

आजपासून दिवाळी अंक प्रदर्शन वाचकांसाठी खुले

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकीत प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचेही  60 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये चांगुलपणाची चळवळमहाराष्ट्राची जत्राकिशोरकालनिर्णयदिवाळी आवाजमिळून सा-याजणीतारांगणमाहेरमार्मिकमहाराष्ट्र टाइम्सलोकसत्तासामनालोकप्रभामिडिया वॉचलोकमत दिपोत्सव असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे.  हे प्रदर्शन पुढील पाच दिवस शुक्रवारपर्यंत राहील.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget