(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारातून देशसेवा करू’ · सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा ध्यास | मराठी १ नंबर बातम्या

‘महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारातून देशसेवा करू’ · सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा ध्यास



·       पुढचे पाऊलच्यावतीने उमेदवारांचा सत्कार व परिक्षार्थींना मार्गदर्शन

 

            नवी दिल्ली, 29 :  महाराष्ट्राच्या मातीच्या संस्काररूपी  शिदोरीतून देशसेवा करूअसा विश्वास सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवरांनी  व्यक्त केला.

            ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात प्रातिनिधीक विचार मांडतांना मृणाली जोशी आणि आदित्य जीवने या उमेदवारांनी या भावना व्यक्‍त केल्या. कवीश्रेष्ठ गोविंदाग्रजांनी वर्णिलेल्या मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा .... राकट देशाकणखर देशादगडांच्या देशानाजुक देशा,कोमल देशा फुलांच्याही देशा....’ या ओळी त्यांनी उदधृत केल्या. हवे तेवढे मृदू राहू पण प्रसंगी राकट व कणखर बाणा जपत उचित निर्णयासाठी आम्ही सदैव तत्पर राहून महाराष्ट्राची पताका सनदी सेवेत डौलाने मिरवू असा मनोदय त्यांनी त्यांच्या प्रातिनिधीक भाषणांतून बोलून दाखवला.

            दिल्ली स्थित मराठी अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या  शेवटच्या  सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व केंद्रीय कार्मीक विभागाचे माजी सचिव दीपक खांडेकरव्हाइस ॲडमिरल सतीश घोरमाडे आणि पुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.  

            मृणाली जोशीआदित्य जिवनेविनायक महामुनीशुभम स्वामीनितीन पुकेनिलेश गायकवाडअंशुमन यादवगौरव साळुंखेश्रीकांत विसपुतेश्रीकांत मोडकसुहास गाडेप्रणव ठाकरेविनायक नरवडे,  सुरज गुंजाळविकास पालवेप्रतीक जुईकरबंकेश पवारसंकेत वाघेअजय डोकेअजिंक्य विद्यागार सुमितकुमार धोत्रे आणि अभिषेक दुधाळ या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

            तत्पूर्वीकार्यक्रमाच्या दुसऱ्या  सत्रात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव संतोष वैद्यविमानतळ सुरक्षा विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकरसंरक्षण मंत्रालयात कार्यकारी संचालक सुशील गायकवाडतामीळनाडू तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आनंद पाटील  आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी  सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवार आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

               कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण उमेदवरांनी  परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले.  दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे तिसरे वर्ष होते.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget