(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा | मराठी १ नंबर बातम्या

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा



महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांहून महापुरुष : डॉ आंबेडकर’ लघुपटाचे थेट प्रसारण

 

            नवी दिल्ली, 26 :  महाराष्ट्र सदन आणि  महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिन’ साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांहून महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे थेट प्रसारणही करण्यात आले.  

           कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर आयोजित कार्यक्रमात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त शामलाल गोयलगुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन’ साजरा

            महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापुरुष : डॉ आंबेडकर’ लघुपटाचे थेट प्रसारण

                       संविधानातून न्यायस्वातंत्र्य ,समता व बंधुता यांची शाश्वती देणाऱ्या  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे आज  सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र  परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील अधिकृत ट्विटरहँडल’,‘फेसबुक’, ‘युटयूब चॅनेल’ आणि कू’ या समाज माध्यमांहून थेट प्रसारण करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १९६८ मध्ये महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाची निर्मिती केली असून श्री. नामदेव व्हटकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे तर ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले आहे.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget