(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार | मराठी १ नंबर बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार

















                      -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

§  नामांकनाचा अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम  पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत प्रगतिपथावर

                                                

            मुंबईदि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हा महाराष्ट्राचा सैनिकी स्थापत्य व गनिमी कावा युद्धनीती आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून  प्राथमिक अवस्थेत युनेस्कोने स्वीकार केला आहेही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या नामांकनाचा अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत प्रगतिपथावर असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            श्री. देशमुख म्हणाले की,  सागरी किल्ल्यांच्या विकासाचा  व जागतिक नामांकनाचा  प्रस्ताव आणि मुंबईतील किल्ल्यांचा विकास कार्यक्रम प्रगतिपथावर आहे.युनेस्को द्वारा जागतिक वारसा दिन जरी 18 एप्रिल रोजी साजरा केला जात असला तरी त्या काळात शैक्षणिक संस्था बंद असल्याने प्राचीन वारसा संबंधी जनजागृती मुख्यतः नवीन पिढीत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय यांच्याद्वारे जागतिक वारसा सप्ताह नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. आजतायगत राज्य शासनाद्वारे संरक्षित एकही स्मारक युनेस्को द्वारा जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले नव्हते. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार झाल्याने आपल्या समस्त महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

            कोविड महामारीच्या काळात निधीची उपलब्धताकामगारांचा तुटवडाबांधकाम साहित्याची        ने-आण करण्यातील अडथळे आणि  साहित्य वाहतूक उपलब्धतेतील समस्याकोविड संबंधित सर्व नियम पाळून संवर्धन कार्य चालू ठेवणे अशा अनेक आव्हानांचा सामना करीत पुनश्च संचालनालयाने संवर्धन कामांना सुरुवात केलेली आहे. राजगडसाल्हेरमुल्हेरअंकाई,टंकाईखर्डागाळणा इत्यादी किल्ल्यांवर तर सिंदखेड राजा येथील स्मारकेभीमाशंकर सुंदर नारायण नीरा नरसिंगपूर येथील मंदिरांचे जतन संवर्धन आता प्रगतिपथावर आहे. येथील संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील  संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतिपथावर आहे. सातारा येथील शस्त्र संग्रहनागपूर व औंध येथील चित्र संग्रह इत्यादींच्या हाय रेझोल्यूशन फोटोग्राफीचे काम याच काळात पूर्ण झाले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

            सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असणारे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालय हा जागतिक वारसा सप्ताह आपल्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच प्रादेशिक संग्रहालयांमध्ये  विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत आहे. या कार्यक्रमांमध्ये स्मारक व संग्रहालयामध्ये तज्ज्ञांद्वारे हेरिटेज वॉकवारसा स्वच्छता अभियाननिबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चित्रकला व शिल्पकलेची प्रात्यक्षिकेतसेच प्राचीन इतिहास व वारशासंबंधी व्याख्याने प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमांद्वारे सादर केली जातील.  



Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget