(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत - माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे | मराठी १ नंबर बातम्या

नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत - माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे




            मुंबई, दि. 1 : सैनिक भरतीमध्ये एनडीएमध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. तशीच प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीने याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करावा, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.


            नाशिक येथे महिलांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत व 14 जानेवारी 2021 रोजी सैनिक दिन साजरा करण्याबाबत मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस माजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक (पूनर्वसन) ले. कर्नल रा.रा. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे मेजर प्रांजल जाधव (नि),  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  नाशिक ले.कमांडर ओंकार कापले (नि), सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव, संचालक सैनिक कल्याण औरंगाबाद अमित दळवी उपस्थित होते.


            माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, यासंदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने 15 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेऊन त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. वसतीगृहाची सोय भोजन खर्च, पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचेशी संवाद साधून त्यांना पीटी खेळासाठी मैदानाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच त्यांच्या निवड प्रकियेची व्यवस्था तयार करण्यात यावी. यासाठी समांतर जागेची मागणीच्या माध्यमातून महिलांसाठी 30 जागा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबतचा प्रस्ताव समितीने तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना नोकरीसह भारताचा नागरिक म्हणून त्यांच्या व्यक्तीगत जीवनात या प्रशिक्षणाचा लाभ होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget