(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हयात असलेल्या शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा सन्मान करणार - माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे | मराठी १ नंबर बातम्या

हयात असलेल्या शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा सन्मान करणार - माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे

 



            पुणे : येथे दरवर्षी दिनाक १४ जानेवारी रोजी Army Veterans Day हा कार्यक्रम सैन्य दलामार्फत माजी सैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धास या वर्षी ५० वर्ष पूर्ण होत असल्याने १४ जानेवारी (Army Veterans Day) या दिनाचे औचित्य साधुन सैन्यदला मार्फत आयोजित केलेल्या मेळाव्यातच १९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दातील शहीद सैनिकांचे अवलंबित आणि या युद्धातील गौरव पुरस्कार प्राप्त लाभार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


            स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे निमित्ताने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरे केले जात आहे. तसेच १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेऊन शहिद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वारसांचा तसेच १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.


            शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव करण्याचा कार्यक्रम विविध राज्यामधुन दिनांक १६ डिसेंबर रोजी (भारत पाकिस्तान - युद्धाचा विजयी दिवस) साजरा होत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातूनही हा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी व्हावे अशी अपेक्षा माजी सैनिक यांनी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत दिनांक १४ जानेवारी २०२२ (Army Veteran Day) रोजी आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


            या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून संबंधित उपस्थित होणार आहेत. त्या अनुषंगाने पुणे हे ठिकाण राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व एक दिवस अगोदर येणाऱ्या सर्व वयस्क सन्मानार्थ्यांची राहण्याची व्यवस्था माजी सैनिक, विश्रामगृह, पुणे येथे करणे सोईचे असल्याने पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


            माजी सैनिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासाठी कौशल्य विकास विभागाशी संवाद साधून विविध कौशल्य आधारित शिक्षण अवगत करावे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व कौशल्य विकास विभागांतर्गत काही विशेष कोर्स करुन घ्यावे. तसेच माजी सैनिकांना विभागाकडून विविध सुविधा देण्याच्या दृष्टीने यावेळी आढावा घेण्यात आला.


00000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget