मुंबई, दि. 1 :- मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी पदभार स्वीकारला.
सेवानिवृत्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने श्री. कुंटे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा