(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील 9 दिव्यांगांसह नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्रातील 9 दिव्यांगांसह नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर

 


            नवी दिल्ली1 : महाराष्ट्रातील 9 दिव्यांगांसह नाशिकच्या सर्वाजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहेत.

            दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी 3 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.  यावर्षी महाराष्ट्रातील 9 दिव्यांगांसह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

            सांगलीच्या डॉ. पुनम  अण्णासाहेब उपाध्येमुंबईच्या निक‍िता वसंत राऊत यांना उत्कृष्ट कर्मचारी’ या श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांगांसाठी उत्कृष्ट काम करणा-या वैयक्तिक  आणि संस्थांच्या श्रेणी’ मध्ये सनिका बेदी यांना उत्कृष्ट वैयक्तिक (व्यावसायिक )’ श्रेणीतील  पुरस्कार जाहीर झालेला आहे.

            चलन अक्षमता (चालण्यातील अक्षमतापेशीय अक्षमताबटुत्वएसिड अटैक पीडितबरा झालेला कुष्ठ रोगमस्तिष्क पक्षाघात) या श्रेणीतील रोल मॉडेल’ चा  पुरस्कार लातूरचा  प्रिती पोहेकरकोल्हापूरचे देवदत्ता माने  यांना जाहीर झाला आहे. या श्रेणीतील दृष्टीदोष असणा-या मुंबईतील नेहा पावसकरनागपूरचे राजेश औस‍दानी,  श्रवण दोष असणारे औरंगाबादचे सागर राजीव बडवेबौध्दिक अक्षमता या श्रेणीत रोल मॉडेल’ म्हणुन कोल्हापूरचा प्रथमेश दातेयाच श्रेणीत मूळची महाराष्ट्राची असलेली सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही जाहीर झालेला आहे. दिव्यागांसाठी  सुगम्य  वातावरण निर्म‍िती या श्रेणीत नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह क्रीडा श्रेणीतील उत्कृष्ट क्रिडा खेळाडूचा पुरस्कार कोल्हापूरची वैष्णवी सुतार यांना जाहीर झालेला आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget