मुंबई, २८ डिसेंबर २०२१ : मुंबई हे अधिक लोकसंख्येचे प्रगत शहर आहे. या शहराचे जगभर आकर्षण आहे. रोजगारासाठी देशभरातून नागरिकांना मुंबईत यावेसे वाटते, यामुळे लोकसंख्या वाढून महानगरपालिकेवरील ताण वाढतोय. महापालिकेसमोर विविध आव्हाने आहेत. त्यावर मात करून महापालिका उत्तम काम करीत असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना सांगितले. एमएमआरडीए ने कोविड रूग्णांसाठी देशातील पहिले जम्बो फील्ड रूग्णालय उभारले. महापालिकेच्या संबंधित सर्वांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोविड काळात झालेल्या कामांबद्दल निती आयोगासह मुंबईचे सर्वत्र कौतुक झाले. निती आयोगानुसार आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इज ऑफ डुईंगमध्ये महापालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. शहरातील दोन हजार किमी रस्ते येत्या पाच-सहा वर्षात काँक्रीटचे केले जातील असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
००००००
टिप्पणी पोस्ट करा