(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन

 


 

            मुंबईदि. 16 : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून,  https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जातीविजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभजइमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

            तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी२०२२ ही अंतिम तारिख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget