(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बांधणार - उपमुख्यमंत्री अजित पवार | मराठी १ नंबर बातम्या

वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बांधणार - उपमुख्यमंत्री अजित पवार·       तूळापूर येथील स्मृतीस्थळवढु बुद्रुकच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करणार

·       तुळापूरवढू बुद्रुक विकासासाठी दीडशे कोटींचा आराखडा

·       मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराजांच्या राजगड पायथ्याच्या समाधीस्थळाचाही विकास

 

            मुंबईदि. 27 : स्वराज्याचे दुसरे छत्रपतीस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचेभव्यप्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळशिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसेच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.

            महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीमहाराष्ट्राचे आराध्य दैवतस्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्रस्वराज्याचे दुसरे छत्रपतीस्वराज्यरक्षकछत्रपती संभाजी महाराज हेमहाराष्ट्राची अस्मिताअखंड महाराष्ट्राचेसंपूर्ण देशाचे प्रेरणास्थानस्फूर्तीस्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचेमहाराष्ट्राच्या अभिमानस्वाभिमानाचे रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्यछत्रपती संभाजी महाराजांनी केले. महाराष्ट्र धर्माचेस्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनाएकावेळी अनेक शत्रूंचाअनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञानगुण आणि चारित्र्याने संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्याने केला. छत्रपती संभाजी महाराज शूरपराक्रमी होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्लास्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या ऐतिहासिक तुळापूर गावातछत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा देह ठेवलाअखेरचा श्वास घेतला. तुळापूरपासून जवळशिरुर तालुक्यातल्यावढु बुद्रुक गावीछत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. स्वराज्यरक्षकछत्रपती संभाजी महाराजांनी ज्याठिकाणी आपला देह ठेवलाजिथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतलात्या ऐतिहासिक तुळापूर गावाचातसेचजिथे छत्रपती संभाजी महाराजांची संमाधी आहेत्या वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यत्यागपराक्रमाचाज्ञानगुणचारित्र्यसंपन्नतेचास्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारेजागतिक दर्जाचेभव्य स्मारकवढू बुद्रुक इथेमहाराजांच्या समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.

       छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठीत्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण तूळापूर आणि वढू बुद्रुकला भेट देतात. या सगळ्यांसाठी हे स्मारक केवळ पर्यटनस्थळ असणार नाही तरछत्रपती संभाजी महाराजांना वंदनअभिवादन करण्यासाठी वढू बुद्रुकला येणाऱ्या प्रत्येकासाठीहे स्मारक प्रेरणादायीस्फुर्तीदायी ठरावेअसा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे हौतात्म्य हामहाराष्ट्राच्या अभिमानाचास्वाभिमानाचागौरवशाली इतिहास आहे. या हौतात्म्याला इतिहासात जाज्वल्य राष्ट्राभिमानाची किनार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंमहाराष्ट्राच्या मावळ्यांमधली स्वराज्यरक्षणाची भावना तीव्र झाली. प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी पेटून उठला. स्वराज्यासाठी लढण्यास सिद्ध झाला. संभाजी महाराजांच्याबलिदानाने मावळ्यांना लढण्याचीजिंकण्याची ताकदप्रेरणा दिली. या बळावरनंतरच्या काळातस्वराज्याच्या मावळ्यांनीऔरंगजेबासहस्वराज्याच्या शत्रूंविरुद्ध निकराने लढा दिला. स्वराज्याच्या शत्रूंना जेरीस आणलं. सळो की पळो करुन सोडले. मावळ्यांच्या हल्ल्यांपुढे खुद्द औरंगजेब सुद्धा थकलाआणि महाराष्ट्राच्या याच मातीत त्याची अखेर झाली. महाराष्ट्राचा अभिमानस्वाभिमानस्वराज्याचा गौरवशाली इतिहास असलेल्याछत्रपती संभाजी महाराजांचे वढू बुद्रुक इथे भव्यदिव्यजागतिक दर्जाचं स्मारक व्हावे. वढु बुद्रुक आणि तूळापूर या ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा, हा राज्य शासनाचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. या स्मारकाच्या उभारणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचात्यागाचापराक्रमाचा खराखुरा इतिहास सर्वांपर्यंतविशेषत: भावी पीढीपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची रुपरेषा सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले कीछत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असलं पाहिजे. त्याला इतिहासाशी साधर्म्य सांगणारा हेरिटेज’ टच असला पाहिजे. स्थानिक ग्रामस्थइतिहासतज्ञ आणि संबंधीत सर्वांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा ठरवण्यात येणार आहे. स्मारक जागतिक दर्जाचे व इतिहासावर आधारित होण्यासाठीस्मारक आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करुन स्मारकाचे बांधकाम केले जाईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यासाठीअनेक विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. वढू बुद्रुक गावातील मुख्य प्रवेशद्वार हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या अशा दगडामध्ये बांधकाम करणे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या समाधीस्थळाच्या भिंती व बुरुज इतिहासकाळास अनुरुप अशा, त्यापद्धतीने बांधकाम करणे. मावळा’ वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे. समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुद्देशिय सभागृह निर्माण करणे. भक्तनिवास बांधणे. समाधीस्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे रंगविणे. निवडक झाडांखाली पारंपरिक पद्धतीने पार बांधणे. वढू बुद्रुक गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करणे. नाले आणि जलस्त्रोतांची सुधारणा करणे. पूल आणि बंधाऱ्यांचा विकास करणे. वढू बुद्रुक गावात वाहुकीची कोंडी सोडवण्यासाठी रिंगरोड तयार करणे. वढू बुद्रुक येथील नदीवर घाट बांधणे. समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडणे.भविष्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा-सुविधा प्रदान करणे. आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

            छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या आजूबाजूला जंगलातील झाडे लावण्यात येणार आहेत. डोंगराळ प्रदेशातील अंतर्देशीय सरोवरे व पाणवठ्यांमुळे चिंचकरंजगोरखचिंचतुतीआंबाफणसकवठकमरखबोरआसन अशाप्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यास वाव असल्याने तशा पद्धतीनं वृक्षारोपण करणे. ही झाडे त्या भागात प्रचलित असलेल्या परिसंस्थेसाठी अन्नाचे स्त्रोत बनतील. यासोबतच बांबूच्या झाडांच्या लागवड या शक्यतांव्यतिरिक्त देशी झाडांच्या लागवडीलासंगोपनाला चालना देण्यासाठी वनस्पती रोपवाटिकेचा विकास करणे. या विकासकामासाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी विशेष कार्यक्रम-योजना राबविण्यात येईल व त्यासाठी अंदाजे रु. 150 कोटी इतका निधी आवश्यक असून तो टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावेळी सांगितले.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget