(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अग्नि प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सल्लागार नोडल एजन्सीची नेमणूक विचाराधीन - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख | मराठी १ नंबर बातम्या

अग्नि प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सल्लागार नोडल एजन्सीची नेमणूक विचाराधीन - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 


            मुंबई, दि. 23 : राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेत्यानुषंगाने अंदाजपत्रक तयार करणेसंबंधित प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या प्राप्त करणेसंस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे व अग्नि सुरक्षेसाठी सल्ला देण्याकरिता नोडल एजन्सी नियुक्त करण्याबाबत अभिव्यक्ति स्वारस्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवेळी दिली.

            सदस्य अंबादास दानवे यांनी औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात मनमानी कारभार व आर्थिक घोटाळे आदी प्रकाराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये अग्नि प्रतिबंधक सुरक्षा अधिक सक्षम कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन अग्नि प्रतिबंधक सुरक्षेबाबत सूचना केल्या आहेत. याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. कुठल्याही रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णत: प्रयत्न करण्यात येत आहोत.

            नेत्रपेढीच्या दृष्टीने विभागाला सूचना दिल्या जातील. त्यासाठी लागणारी मान्यता देण्यात येणार असल्याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले.    साहित्य व उपकरणे खरेदी प्रकरणामध्ये हाफकीनकडून कुठलीही दिरंगाई होऊ नये, यामध्ये सुलभता येण्यासाठी पाऊले उचलली जातील.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयऔरंगाबाद येथे वाढत्या विद्युत मागणीचा विचार करता सर्जिकल इमारतीची वायरींग बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले अंदाजपत्रक तपासून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयऔरंगाबाद येथे ३ ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट आहेतत्यापैकी दोन प्लान्ट प्रधानमंत्री योजनेअंतर्गत असूनएक सी.एस.आर. फंडातून आहे व तीनही प्लान्ट है कार्यरत आहेत. कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये हे प्लान्ट उपयुक्त ठरु शकतील. प्लान्ट नियमित सुरु राहाण्यासाठी जनित्र आणि ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असतेत्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी दोन जनित्र प्राप्त झालेले असून सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागामार्फत प्रस्थापित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयऔरंगाबाद संस्थेने कोविड-१९ च्या संकटकाळात औरंगाबाद प्रशासकीय विभाग तसेच मराठवाड्यातील इतर लगतच्या जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. संस्थेने कोविड-१९ च्या पहिल्या लाटेमध्ये असणारी ४५८ बेडची संख्या दुसऱ्या लाटेमध्ये १००० बेडपर्यंत वाढविली आहे. तसेच १२.५ मेट्रीक टन क्षमतेच्या १ लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लान्टची संख्या ९५ मेट्रीक टन क्षमतेच्या १० लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांटपर्यंत वाढवून हा वाढीव ऑक्सिजन प्रामुख्याने कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये इतर जिल्ह्यांना पुरविला आहे.

            कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे व भविष्यातही घाटी रुग्णालयात अशी सेवा कायम पुरविण्यास शासन कटीबद्ध आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील विविध इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदनवी मुंबई यांनी सुरक्षा परिक्षण केले असून सुरक्षा परिक्षणाचा अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णालयामध्ये आगसदृश्य घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये या करिता संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना अग्निशमन विभागामार्फत अग्नीशमन यंत्रणा वापराबाबतचे प्रशिक्षण दिले असून सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशमन सिलेंडर स्थापित करण्यात आले आहेत.

००००

 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget