(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हिवाळी अधिवेशन 2021 : विधानपरिषद लक्षवेधी | मराठी १ नंबर बातम्या

हिवाळी अधिवेशन 2021 : विधानपरिषद लक्षवेधी

 


मुंबई शहर व उपनगरमध्ये गृहनिर्माण संस्थाच्या

पुनर्विकासासाठी  म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील

- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

             मुंबईदि. 23 : मुंबई शहर व उपनगरमध्ये गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासासाठी म्हाडा नक्कीच प्रयत्नशील आहे, अशी माहिती विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

              सदस्य भाई जगताप यांनी मुंबई शहर व उपनगरमध्ये जवळपास 50 हजार गृहनिर्माण संस्था आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एक लाख गृहनिर्माण संस्था आहेत यांच्या पुर्नविकासाबाबत अनेक समस्या आहेत या शासनाने प्राधान्याने सोडवाव्यात अशी लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली. सदस्य सर्वश्री डॉ.वजाहत मिर्झा, राजेश राठोड, जयंत आसगावकर, डॉ.सुधीर तांबे, प्रसाद लाड यांनी या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला.

         गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील विनियम ३३(७) नुसार मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याची तरतूद आहे. या तरतूदीनुसार मुंबई शहरातील व उपनगरातील अस्तित्वातील जीर्ण  तसेच असुरक्षित विद्यमान भाडेकरुंच्या ताब्यातील तसेच बिगर उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास अतिरिक्त चटईक्षेत्र देणे. मुंबई व मुंबई उपनगरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन विकास नियंत्रण व प्रोत्साहन  देखील करण्यात येते. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या इमारतीच्या विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून नगरविकास विभागाच्या समन्वयातून उचित निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत सादर केली.

******

विधानपरिषद लक्षवेधी :

 

विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महापूर नुकसान भरपाईबाबत बैठक घेणार

- आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

            मुंबईदि. 23 : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत काही प्रकरणात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

              विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील व्यापाऱ्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्याकडून काही प्रकरणात टाळाटाळ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, भाई जगताप यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

                 मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, विमा कंपन्याकडून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे ८००  दावे दाखल होते त्यापैकी ५१५ दावे निकाली निघाले आहेत. तर २८५ दावे प्रलंबित आहेत तर फ्युचर  जनरल लिमिटेड कंपनीकडे १३ दावे  दाखल पैकी १३ ही प्रलंबित आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे २३३ दाखल दाव्यांपैकी १४० दावे निकाली काढण्यात आले आहेत ७० दावे प्रलंबित  २० दावे नाकारलेले आहेत तर २ परत घेतलेले दावे आहेत एस.बी.आय  जनरल कडे १८ दावे दाखल होते त्यापैकी ११ दावे निकाली काढले आहेत. ७ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित दाव्याबाबत विमा कंपन्याना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तसेच विमा कंपन्यानी  सहकार्य करावे या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच  या विमा कंपन्या जर नुकसान भरपाई देत नसतील तर हे व्यापारी ग्राहक न्यायालयातही दाद मागू शकतात, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  दिली.

*******

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget