(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा लक्षवेधी : पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पथदिवे आणि हायमास्ट बसविणार - आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे | मराठी १ नंबर बातम्या

विधानसभा लक्षवेधी : पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पथदिवे आणि हायमास्ट बसविणार - आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 


 

            मुंबईदि. 27 : पालघर जिल्ह्यातील 30 शासकीय आश्रमशाळांमध्ये सोलर पथ दिवे आणि हायमास्ट बसविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईलअसे आदिवासी विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            कोविड-१९’ च्या प्रार्दुभावामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याने व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा कोविड-१९ ची लागण झाल्याने व शासनाच्या निर्देशानुसार कार्यालयातील उपस्थिती संख्येवर मर्यादेत निर्बंध असल्याने तसेच प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पडहाणू येथील प्रकल्प अधिकारी यांचेकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने या प्रकरणावर विहित मुदतीत कार्यवाही करणे शक्य झाले नाही. तथापिही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईलअसे राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले. या कामांना विलंब होण्याची अन्य कारणे असल्यास त्याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईलअसेही ते म्हणाले.

            यासंदर्भात सदस्य श्री.सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

०००००


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget