(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

 


 

            मुंबईदि. 27 : विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या विधानपरिषदेतील सदस्य सर्वश्री रामदास कदमअमरीश पटेलसतेज पाटीलअशोक उर्फ भाई जगतापगोपिकिशन बाजोरियाअरुणकाका जगतापप्रशांत परिचारकगिरिशचंद्र व्यासयांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आला.

            विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणालेरामदास कदम यांची राजकीय कारर्कीद पाहताना कोकणातील जनतेविषयी त्यांना असलेले प्रेम दिसले. कोकणातील जनतेची कामे त्यांनी जबाबदारीने पार पाडली. पक्षाने दिलेली जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

             सदस्य भाई जगताप एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. तसेच प्रत्येक विषयावर त्यांची भूमिका ते ठामपणे मांडतात.

            गिरिशचंद्र व्यास हे ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभागृहाची परंपरासंस्कृती जपत सर्वांनी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांचा वैचारिक ठेवा त्यांनी या सभागृहाला दिला आहेअसेही श्री.निंबाळकर यांनी सांगितले.

            विधान परिषद सभागृहात येणारा प्रत्येक सदस्य या सभागृहासोबत एकरुप होऊन जातो. परस्परांमध्ये आपोआप स्नेहसंबंध निर्माण होतात. राजकारणापलिकडे जाऊन एक माणूस म्हणून आपली ओळख निर्माण होते. अशी या सभागृहाची वैशिष्ट्ये आहेतअसेही ते म्हणाले.

            विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्यारामदास कदम हे कोकणातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. सभागृहात अनेक भाषणामधून त्यांनी कोकणातील जनताआदिवासी समाज याविषयी विविध प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. सामान्य जनतेच्या मनात त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखे अढळ असेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सदस्य भाई जगताप त्यांनी कामगारांचे प्रश्नसामाजिक प्रश्नहक्कभंगचे प्रश्न प्राधान्याने सभागृहात मांडले. महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या समस्या व  प्रश्नावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

            यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरशशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी राजकारणात आणि समाजकारणात तसेच सभागृहात केलेल्या कामकाजाला यावेळी उजाळा देण्यात आला.

0000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget