मुंबई, दि. 27 : राज्यातील ‘कायम’ शब्द वगळलेल्या अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदानासाठी घोषित करावयाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याबाबत पडताळणी सुरु आहे. यात पात्रतेबाबतच्या हरकती व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संस्थांना व शाळांना वेळ देण्यात आला आहे. यानंतर अशा शाळांची अंतिम यादी तयार करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
या विषयाच्या अनुषंगाने सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
***
टिप्पणी पोस्ट करा