(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशनाच्या कार्यासाठी अधिकचा निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार | मराठी १ नंबर बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशनाच्या कार्यासाठी अधिकचा निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार




डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबईदि. 16 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मराठी अनुवादित खंडाच्या माध्यमातून त्यांचे विचार ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी भाषेतल्या २२ खंडांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे काम समितीने युद्धपातळीवर करावे. या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या खंडामध्ये डॉ. आंबेडकरांचे 'पीएचडी.'च्या 'ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांतीआणि 'डी.एससी.'च्या प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या शोध प्रबंधाचे मराठीत भाषांतर केले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे या कार्यासाठी अभिनंदन केले.

            या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊतसमितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावेसमितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकरसदस्य डॉ. प्रज्ञा पवारसहसंचालक डॉ. सोनाली रोडेसदस्य धनराज कोहचाडेदुरदृश्यप्रणालीद्वारे एन जी कांबळेएम एल कासारेगिरीराज बागुल आदीसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणालेसमाजातल्या सर्व घटकांना समान न्यायविकासाची समान संधी मिळावी तसेचसर्व जातीधर्मपंथांच्याप्रांताच्याविचारांच्या व्यक्तींना अभिव्यक्ती स्वातंत्र्यप्रथा-परंपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य घटनेद्वारा डॉ. आंबेडकर यांनी दिले आहे. या स्वातंत्र्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. देशाचा कारभार डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या आधारानेच चालला पाहिजे. या पद्धतीने कार्य करण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपली आहे.

             डॉ. आंबेडकरांचे चरित्रत्यांचे विचारलेखन मराठीतून तसेच डिजीटल माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहाचविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीने पार पाडावे.

            डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करताना माझ्यावरची जबाबदारी वाढत असूनवंचित उपेक्षितांच्या हिताचाच निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून जनहितार्थ निर्णय भविष्यात घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            समितीचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले१५ मार्च १९७६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली असूनतेव्हापासून हे साहित्य जगभर पोहोचले आहे. समितीने लेखन आणि भाषणाचे २२ खंडसोर्स मटेरियलचे ३ खंड प्रकाशित केले आहे. यावर्षी जुलै 2021 मध्ये आपण प्रकाशन समितीची पुनर्रचना केली आणि सहा महिन्यातसहाव्या मराठी अनुवादाचा खंड प्रकाशित होत आहे.

            ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणालेडॉ. आंबेडकरांनी आपल्या शोध प्रबंधात नेमकी काय भूमिका मांडलीत्यांचे या प्रबंधातील विचार आजही कसे प्रासंगिक आहेतहे आपल्या मातृभाषेत समजून घेण्याची संधी या निमित्ताने मराठी वाचकांना व अभ्यासकांना मिळणार आहे. सर्व ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

०००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget